शिर्डी - विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील वैर हे या निवडणुकीत आणखीनच वाढल्याच दिसून येतंय. सुजय विखेंना नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीने सोडली नाही, अशा वेळी बाळासाहेब थोरात विखेंच्या मागे उभे राहीले नाहीत. उलट सुजय भाजपात गेल्यानंतर थोरातांनी त्याच्या विरोधात प्रचार केला होता. आता नगरचे मतदान झाल्याने सुजय विखेंनी थोरातांचा मतदार संघ असलेल्या संगमनेरात तळ ठोकलाय. आजच्या सभेत सुजयने थोरातांवर जोरदार टीका केली आहे....
'मी काही राधाकृष्ण विखे नाही', डॉ. सुजय विखेंचा थोरातांना इशारा - Sujay Vikhe
शरद पवारांनी सांगीतले की, सुजय विखेंना तिकीट देवू नका. मी काय वाईट केले होते. हे थोरातांनी स्पष्ट करावो. मी काही राधाकृष्ण विखे नाही. फार, चुकीच्या मानसाला बोट लावलंय, असा इशारा डॉ. सुजय विखेंनी संगमनेरातील प्रचार सभेत थोरातांना दिलाय.....
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहाणारे नेते माझ्या पराभवासाठी नगरमध्ये तळ ठोकून बसले होते, पण महायुतीचा सर्वसामान्य कार्यकर्ता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता. प्रामाणिक भावनेने कार्यकर्त्यांनी काम केल्यामुळेच दक्षिणेचा विजय निश्चित आहे. उत्तर काबीज करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करुन खासदार लोखंडेंच्या पाठीशी उभे राहावे. कोणी कितीही ताकद लावू द्या, विजय हा विचारांचाच होईल, असा विश्वास युवानेते सुजय विखे पाटील यांनी केलाय. आपल्या भाषणात डॉ. सुजय विखे यांनी, या तालुक्याच्या नेत्यांनी मला येवून विनाकारण विरोध केला. त्याची परतफेड करण्यासाठी मी आता तालुक्यात आलो आहे. शिर्डी मतदार संघातही कोणी कितीही ताकद लावू द्या, गाव पातळीवर तुम्ही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम करा..इतके वर्षे सत्ता असूनही पाण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत. या तालुक्यात परिवर्तन व्हायला वेळ लागणार नाही पण थोडेसे जमीनीवर यावे लागेल,केवळ नेत्यांनी विधानसभा लढण्याचे
स्वप्न पाहून नये तर कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी आधी पुढे यावे. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील प्रामाणिकपणे काम करावे नाहीतर सकाळी युती आणि संध्याकाळी यशोधन असे होवू देवू नका, असे खडे बोलही दोन्ही थडीवर हात ठेवुन असलेल्या कार्यकर्त्यांना सुनावले आहेत.