अहमदनगर - खासदार उदयनराजेंच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलासुरला नेताही भाजपमध्ये आला. त्यामुळे मला त्रास दिल्यास काय परिणाम होतात बघा, अशी झोंबरी टीका खासदार डॉ. सूजय विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे.
'मला त्रास दिल्यावर काय परिणाम होतात दिसलंच असेल' - राधाकृष्ण विखे-पाटील
खासदार उदयनराजेंच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा उरलासुरला नेताही भाजपमध्ये आला असून मला त्रास दिल्यास काय परिणाम होतात बघा, अशी झोंबरी टीका खासदार डॉ. सूजय विखे-पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता केली आहे.
अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या रोड शोनंतर पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना सूजय विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीवर टीका केली. लोकसभा निवडणुकीत उमेदवारीवरून पवार-विखे पाटील झालेला वाद आणि त्यानंतर सूजय यांचा भाजप प्रवेश देशभर गाजला. या प्रतिष्ठेच्या लढतीत सूजय यांनी विजय मिळवत पवारांवर मात केली. कालांतराने राधाकृष्ण विखे-पाटील यांचा भाजप प्रवेश आणि त्यानंतर एकूणच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती थांबता-थांबत नसल्याचे दिसत आहे. त्याचच शुक्रवारी उदयनराजे यांच्या भाजप प्रवेश निश्चितीनंतर काहीसे खुशीत असलेल्या सूजय विखे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना पवारांचे नाव न घेता ही बोचरी टिप्पणी केली.