महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

२ वर्षानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटण्याचं ठिकाण येरवडा जेल असेल - सुजय विखे - सुजय विखे

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू आहेत. यामध्ये माझ्यासारख्याचे काय काम आहे. त्यामुळेच मला लोकसभेला उमेदवारी दिली नसल्याचे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले.

सुजय विखेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

By

Published : Oct 17, 2019, 5:14 PM IST

Updated : Oct 17, 2019, 6:14 PM IST

अहमदनगर - राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळे वाळू तस्कर, डाकू आहेत. यामध्ये माझ्यासारख्याचे काय काम आहे. त्यामुळेच मला लोकसभेला उमेदवारी दिली नसल्याचे वक्तव्य खासदार सुजय विखे पाटील यांनी केले. राष्ट्रवादीच्या नेत्यांना २ वर्षानंतर भेटण्याचं ठिकाण संपर्क कार्यालय नव्हे, तर येरवडा जेल असेल. ईडीची केस झाली तर यांच्या डोळ्यात पाणी आलं, असे म्हणत सुजय विखेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. त्यामुळे येणाऱ्या काळात विखे पवार संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


माझे वडील मंत्री झाले, याचं श्रेय बाळासाहेब थोरातांना
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांचा बालेकिल्ल्या असलेल्या संगमनेरमध्ये भाजपचे खासदार सुजय विखे- पाटील यांची सभा पार पडली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादीसह बाळासाहेब थोरातांवर निशाणा साधला. मी म्हणणार नाही विकास पाहायला गुजरातला जा. दोन मतदारसंघ शेजारी आहेत माझ्या वडिलांचा आणि तुमचा (संगमनेर). आधी आम्ही एकाच पक्षात होतो, मात्र मी सत्ताधारी पक्षात आलो. माझे वडील मंत्री झाले. याच सर्व श्रेय बाळासाहेब थोरात यांना जातं. लोकसभेत तिकीट वाटपावरुन जो गोंधळ झाला त्यामुळे मला मोदींच्या नेतृत्वात काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विधानसभेची निवडणूक झाल्यावर मी बाळासाहेब थोरांतांचा फोटो माझ्या घरात लावणार असल्याचा टोला सुजय विखेंनी लगावला.

सुजय विखेंचा राष्ट्रवादीवर निशाणा

हेही वाचा - 'देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी भाजपने गेल्या पाच वर्षांमध्ये काय केले?'

हेही वाचा - ओमराजेंनी लोकांचे संसार बुडवल्याचा राग म्हणून केला हल्ला; आरोपीचा व्हिडिओ व्हायरल


राष्ट्रवादीवाले म्हणतात वातावरण बदललं आहे. आमच्या सभांना जास्त गर्दी आहे. कोणाच्या तर अमोल कोल्हेच्या सभेला गर्दी आहे. तीन महिन्यात अमोल कोल्हे शेतकरी झाला. कांदा, सोयाबीन, ऊस सगळं यांना समजलं असेही विखे म्हणाले. मग आम्ही काय ३ वर्षांपासून शेतकरी नाही का? निवडणूक झाल्यावर मी देखील एक मालिका काढणार असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी कोल्हेंना लगावला.

Last Updated : Oct 17, 2019, 6:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details