अहमदनगर - 'आमच्या घरामध्ये तुम्ही वाद लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा पदाच्या महत्वकांक्षेपोटी उद्या तुमच्याही कुटुंबात कलह निर्माण होवू शकतो', असा इशारा सुजय विखे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ संगमनेर येथे सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान ते बोलत होते.
..तर तुमच्याही कुटुंबात कलह निर्माण होवू शकतो, सुजय विखेंचा इशारा - sadashiv lokhande
महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ संगमनेर येथे सभा आयोजित केली होती. या सभेदरम्यान ते बोलत होते.
'ज्यांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहिले आहे, अशी माणसे मला हरवण्यासाठी तळ ठोकून बसली. त्यांनी फक्त परिवारात भांडणे लावण्याचे काम केले आहे. बीडमध्ये बहिण-भावात आणि आमच्याकडे काका पुतण्यांमध्ये वाद लावले. या पक्षाचा जन्मच यासाठी झाला आहे. उद्या तुमच्याही घरात पदाच्या महत्वकांक्षेसाठी गृहकलह झाला, तर आश्तर्य वाटु देऊ नका', असेही ते यावेळी म्हणाले.
आम्हालाही बाहेरुन अनेक फोन येतात. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा मी मागील ३ वर्षे सामान्य माणसांच्या संपर्कात होतो. त्यांच्या आशीर्वादानेच निवडणूक लढवित होतो. सर्वांनी प्रयत्न केले तरी तेथील निकाल काय लागणार आहे, हे आता सांगण्याची गरज नाही. मात्र, थोरातांचा मला विरोध का होता, याचे उत्तर मागण्यासाठीच मी तालुक्यात आलो आहे, असे सुजय विखे यांनी यावेळी स्पष्ट केले.