अहमदनगर -कर्जत तालुक्यातील राशीन येथे आज सकाळी खळबळजनक घटना घडली आहे. एका डॉक्टरने पत्नी व मुलांसह आत्महत्या केली आहे. या प्रकाराने नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. डॉ. महेंद्र थोरात असे या डॉक्टरांचे नाव आहे. पत्नी वर्षा, थोरला मुलगा कृष्णा आणि धाकटा कैवल्य यांना सलायन आणि इंजेक्शनमधून विषारी औषध देऊन यांची हत्या केल्यानंतर स्वतः डॉक्टर थोरात यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.
सामाजिक कामात अग्रेसर
डॉ. थोरात हे गरिबांचे डॉक्टर म्हणून ओळखले जात होते. सकाळी पेशंट त्यांच्या घरी गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. सामाजिक कामात अग्रेसर असलेला माणूस नेमके असे कसे काय करू शकतो, याची चर्चा सुरू झाली आहे. पत्नी व दोन मुलांना इंजेक्शन देऊन नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस या घटनेबाबत सखोल तपास करीत आहेत.