अहमदनगर- पाथर्डी तालुक्यातील करंजी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश शेळके यांनी सोमवारी दुपारी एक वाजताच्या दरम्यान उपकेंद्रातच पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी लिहलेली एक सुसाईड नोट सापडली असून त्यात आरोग्य खात्याच्या वरिष्ठांसह तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या तणावात आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. या घटनेने तालुक्यात आणि जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तासगावहून आल्यानंतर डॉक्टर तणावात -
डॉ. शेळके आरोग्य केंद्रात कामावर आले. त्यानंतर काही वेळाने कामानिमित्त तिसगावला गेले. तिसगावाहून परत आले त्यावेळी ते तणावाखाली असल्याचे उपस्थित असलेल्या इतर आरोग्य सेविकांना जाणवले. सेविकांनी त्यांच्याशी संवाद केला. नोकरीमध्ये हे होतचं असते म्हणत काळजी घेऊ नका, असे सेविकांशी शेळके यांना म्हटले. त्यानंतर ते पेन व कागद घेऊन आले. टॅब जमा करा, मी राजीनामा लिहिणार आहे, असे त्यांनी आरोग्य सेविकांना सांगितले. त्यानंतर ते दुसऱ्या रुममध्ये गेले व दरवाजा आतून लावुन घेतला.
पंख्याच्या हुकला दोरीच्या सहाय्याने घेतला गळफास -