महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीतील साखरेचे पोते चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात - साखरेची पोती

शिर्डी साईनगर रेल्वे पोलीसांनी मालगाडीच्या डब्यातून साखरेची पोती चोरी करणाऱया चार आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 50 साखरेची पोती आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिर्डीतील साखरीचे पोते चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात

By

Published : Aug 18, 2019, 9:11 PM IST

अहमदनगर- शिर्डी साईनगर रेल्वे पोलिसांनी मालगाडीच्या डब्यातून साखरेची पोती चोरी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून 50 साखरेची पोती आणि वाहने असा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिर्डीतील साखरीचे पोते चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात
साईनगर रेल्वे पोलिसांच्या हद्दीत असलेल्या येवला रेल्वे स्टेशनजवळ उभ्या असलेल्या मालगाडीतून 14 ऑगस्टच्या मध्यरात्री साखर पोती घेवून जाणाऱ्या माल गाडीतून साखरेची पोती चोरताना २ जाणांना रंगेहात पकडले होते. तर दोघे अंधाराचा फायदा घेवून फरार झाले होते. या कार्यवाहीवेळी दोन आरोपींसह पन्नास किलोच्या 46 साखर गोण्या, मोटारसायकल आणि रिक्षा असा मुद्देमाल जप्त केला. आरोपीच्या चौकशीदरम्यान मिळालेल्या माहीतीनंतर पोलिसांनी आज (रविवार) दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडूनही 4 साखर गोणी हस्तगत केली आहेत. यातील चार जणांविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ०२/२०१९ भादवि कलम, ३(A) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details