अहमदनगर -जिल्ह्यातील साखर सम्राटांनी जिल्ह्यातून पेट्रोल - डिझेलला हद्दपार करावे. शेतकऱ्यांचा पेट्रोलचा खर्च वाचवा आणि शेतकरी फक्त अन्नदाता नाही तर ऊर्जा दाता बनला पाहिजे, असे आवाहन केंद्रीय रस्तेबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नितीन गडकरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले दौऱ्यावर असताना त्यांनी हे आवाहन केले.
माहिती देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही वाचा -Sai Baba Temple Shirdi : पुण्याच्या भाविकाकडून साई चरणी 5 हजार आंबे दान
देशात साखरेचे प्रमाणापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे. ऊस हे हमखास नफा देणारे पीक आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा या पिकाकडे कल वाढला आहे. त्यामुळे, साखर कारखान्यांनी साखरेपासून इथेनॉल तयार करावे. इथेनॉल विकले तरच साखर कारखाने टिकतील. पुढच्या महिन्यापासून फ्लेक्स फ्युएल इंजिन असलेले स्कुटर, रिक्षा, ट्रक, कार, बस बाजारात येणार आहेत. ते संपूर्ण इथेनॉलवर चालू शकतील अथवा इथेनॉल व पेट्रोलच्या मिश्रणावर चालतील. इथेनॉलची किंमत पेट्रोलच्या निम्मी आहे. शिवाय दोन्ही इंधनातून वाहनांना सारखेच एव्हरेज मिळेल. इथेनॉलमधून प्रदूषण होणार नाही. त्यामुळे, इथेनॉलची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे. त्यामुळे, मी अहमदनगर जिल्ह्याला इथेनॉल पेट्रोल पंप मिळवून देतो, असे सांगत गडकरी यांनी जिल्ह्यातून पेट्रोल - डिझेल हद्दपार करा असेही यावेळी गडकरी म्हणाले.
मी करतो तेच बोलतो आणि बोलतो तेच करतो, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. येत्या काळात पाण्यामधून हायड्रोजन वेगळे काढून त्यावर विमान आणि रेल्वे चालवणार असेही गडकरी म्हणाले आहे. आजची स्थिती ही गहू स्वस्त, तर ब्रेड महाग आणि टोमॅटो स्वस्त तर सॉस महाग अशी आहे. जेव्हा गरज होती तेव्हा उसापासून साखर तयार केली. लोक ऊस लावत आहेत. त्यात नफा आहे. आज आपल्या देशात साखर सरपल्स आहे, त्यामुळे येत्या काळात साखरेऐवजी अन्य पदार्थांकडे वळण्याची गरज आहे.
हेही वाचा -First Private Train : पहिली खासगी रेल्वे पोहोचली शिर्डीत, स्टेशनवर करण्यात आले स्वागत