महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत विखे-पाटील विरोधात सुधीर तांबे ?

शिर्डी मतदार संघातून अद्याप काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. मात्र, सुधीर तांबे विरुध्द राधाकृष्ण विखे, असा सामना येथे रंगल्यास संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागणार आहे.

शिर्डीत विखे पाटील विरोधात सुधीर तांबे ?

By

Published : Sep 30, 2019, 5:30 PM IST

Updated : Oct 1, 2019, 12:49 PM IST

अहमदनगर- राज्याचे माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष आणखीनच रंगणार असा दिसून येत आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघातून थोरातांचे मेव्हणे आमदार सुधीर तांबेंना काँग्रेसकडून उमेदवारी देत मैदनात उतरविण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. असे झाल्यास राज्यात शिर्डीची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे.

शिर्डीत विखे पाटील विरोधात सुधीर तांबे ?

हेही वाचा-लातूरकरांच्या आठवणीतली 'मामुली' निवडणूक; विलासरावांनाही पत्करावा लागला होता पराभव

गेल्या अनेक वर्षापासून विखे आणि थोरात यांच्यात राजकीय संघर्ष राहीला आहे. जिल्हापरीषद निवडणुकीत सत्यजीत तांबेंना काँग्रेसकडून जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याऐवजी बाळासाहेब विखेंनी त्यांच्या सुनबाई शालिनी विखे यांना जिल्हा परिषद अध्यक्ष केले. त्यामुळे हा संघर्ष काही काळ चांगलाच गाजला होता. त्यानंतर पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाकडून सुजय विखेंना तिकीट मिळवताना बाळासाहेब थोरात यांनी विखेंची बाजू न घेतल्याने हा संघर्ष आणखी पेटला आहे. लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही विखे कुटुबीयांनी संगमनेर येथे जावून थोरात यांच्या विरोधात रणशिंग फुकले होते.

हेही वाचा-पृथ्वीराज चव्हाणांना का लढवावी वाटत नाही लोकसभा निवडणूक?

थोरात आणि विखेंचे पक्षही आता वेगळे असल्याने त्याच्यातील संघर्ष आणखीच वाढला आहे. संगमनेर येथे थोरात विरोधात विखेंच्या नेतृत्वाखाली उमेदवार उभा केला जाणार आहे. त्यामुळे विखें-विरोधात तांबे कुटुबीयांतील सदस्य उभा करण्याची शिर्डी आणि संगमनेर मतदार संघातील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हालचाल होवू लागली आहे. विधानसभेच्या उमेदवाराच्या मुखालती वेळी सत्यजीत तांबेंनी शिर्डी विधानसभेतून इच्छुक म्हणून मुलाखात दिली होती. मात्र, आता सत्यजीत तांबेंनीच आज त्यांचे वडील विधानपरिषदेत पदविधर मतदार संघातून आमदार असलेले सुधीर तांबे शिर्डीतून काँग्रेसची उमेदवारी देऊ शकतात असे स्पष्ट संकेत दिले आहेत.

हेही वाचा-रणधुमाळी विधानसभेची : अशोक चव्हाणांचा उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डी विधानसभा मतदार संघात संगमनेर तालुक्यातील 26 गावांचा समावेश आहे. त्यात थोरात समर्थकांची संख्या मोठी आहे. विखेंनी थोरातांच्या मतदार संघात अधिक लक्ष दिले आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची तयारी केल्याने थोरातांनाही आता त्यांच्या मतदार संघातील 26 गावातून आपल्या कार्यकर्त्यांना विखे विरोधात बळ देण्याची तयारी केली आहे. त्याच बरोबरीने शिर्डी मतदार संघातीलही काही गावात थोरातांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिर्डी मतदार संघात विखेंविरोधात असलेल्या मोठ्या प्रमाणातील नाराजीचा फायदा घेण्याची व्युव्हरचना आता काँग्रेसने आखण्यास सुरवात केली आहे. शिर्डी मतदार संघातून अद्याप काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. सुधीर तांबे विरुध्द राधाकृष्ण विखे, असा सामना येथे रंगल्यास संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागणार आहे.

Last Updated : Oct 1, 2019, 12:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details