महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर : वंचित आघाडीच्या सुधाकर आव्हाडांचा उमेदवारी अर्ज दाखल - file

वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय जनता स्वीकारेल आणि माझा विजय होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला.

विश्वास आव्हाड

By

Published : Apr 4, 2019, 12:19 PM IST

अहमदनगर - वंचित बहुजन आघाडीचे नगर दक्षिणेतील उमेदवार सुधाकर आव्हाड यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भारिप-बहुजन, एमआयएम आदी समविचारी संघटना-पक्षाचे नेते उपस्थित होते.

अहमदनगर : माध्यमांशी संवाद साधताना विश्वास आव्हाड

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात आघाडी विरुद्ध युती असा लक्षवेधी सामना असताना आणि दोन्हीकडून प्रचंड शक्ती प्रदर्शन होत आहे. अशातच वंचित बहुजन आघाडी हा तिसरा पर्याय जनता स्वीकारेल आणि माझा विजय होईल, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

वंचित बहुजन आघाडी हा पक्ष खऱ्या अर्थाने सामान्य बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करणारा पक्ष आहे. गावातील शेवटच्या झोपडीपर्यंत विकास हा आमचा अजेंडा आहे. त्यामुळे समोर कितीही धनदांडगे उमेदवार असले तरी त्याची मला चिंता नाही. माझे नाव जनतेपर्यंत पोहोचले आहे. जनतेला आपला वाटणारा लोकप्रतिनिधी हवा असल्याने मोठे मताधिक्य मिळेल असेही आव्हाड म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details