महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बस वेळेत येत नसल्याने विद्यार्थ्यांनी शेवगाव येथे केले रास्ता रोको आंदोलन - Shegaon ST Corporation

आंदोलनादरम्यान शेवगाव एस.टी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे तास बुडून शैक्षणिक नुकसान होत असल्याचे कापरे म्हणाले. तर, विद्यार्थी महाविद्यालयात सुरक्षित व वेळेवर पोहचावे यासाठी वेळेवर बस सुविधा द्यावी, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी पुजा निकम यांनी केली.

ahmadnagar
आंदोलना दरम्यानचे दृश्य

By

Published : Dec 25, 2019, 6:33 AM IST

अहमदनगर- शेवगाव तालुक्यातील मळेगाव, सामनगाव, वडुले बुद्रुक येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बस वेळेत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष शिवराज कापरे यांच्या नेतृत्वाखाली सामनगाव तालुक्यातील शेवगांव येथे विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

आंदोलना दरम्यानचे दृश्य

आंदोलनादरम्यान शेवगाव एस.टी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांचे तास बुडून शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार कापरे यांनी केली. तर, विद्यार्थी महाविद्यालयात सुरक्षित व वेळेवर पोहचावे यासाठी वेळेवर बस सुविधा द्यावी, अशी मागणी विद्यार्थी प्रतिनिधी पुजा निकम यांनी केली. आंदोलनाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुमारे दोन तास रस्ता रोको चालल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेवगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी राजेंद्र चव्हाण यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, शेवगाव एसटी महामंडळाचे डेपो मॅनेजर देवराज यांनी आंदोलन स्थळी येवून बस सकाळी 7 वाजता येईल, असे लेखी आश्वासन दिल्ये त्यानंतरच आंदोलन मागे घेण्यात आले.

यावेळी बाळासाहेब आगळे, लक्ष्मण सातपुते, दादा शेलार, कृष्णा सातपुते, सुरेश म्हस्के पांडुरंग कापरे यांच्यासह विद्यार्थी मार्तंड नजन, गणेश मिसाळ, ओमकार कापरे, आदेश काबळे, पुजा निकम, आकांक्षा नवघरे, उज्वला झाडे, ज्योगेश्वरी कोठे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा-पुणे-नाशिक महामार्गावर कारचा टायर फुटला; महिलेसह मुलगी जागीच ठार

ABOUT THE AUTHOR

...view details