महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत पोलिसांची अतिक्रमणावर धडक कारवाई - strict action

शिर्डीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवाला येणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी, शिर्डी वाहतूक शाखा आणि शिर्डी नगरपंचायत यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई राबवण्यास सुरुवात केली आहे.

शिर्डीत पोलिसांची अतिक्रमणावर धडक कारवाई

By

Published : Jul 9, 2019, 3:01 PM IST

अहमदनगर -शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी प्रमुख उत्सवांपैकी एक म्हणजे गुरुपौर्णिमा होय. या उत्सवादरम्यान शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी होत असते. याच पार्श्वभूमीवर शिर्डी वाहतूक शाखा आणि शिर्डी नगरपंचायत यांनी संयुक्तपणे अतिक्रमण कारवाई राबवण्यास सुरुवात केली आहे. साईमंदिर प्रवेशद्वार क्रमांक चार समोरील रस्त्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.

पोलिस निरीक्षक- नितिन गोकवे
उत्सवादरम्यान भाविकांना फुटपाथ मोकळा मिळावा, तसेच बेशिस्तपणे पार्क केलेल्या दुचाकींचा अडसर होऊ नये. यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये प्रसादाची रस्त्यावर असलेली दुकाने, फोटो आणि लॉकेटची दुकाने तसेच फुलहाराची दुकाने अशा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ आधिकाऱ्यांच्या सूचनेप्रमाणे भाविकांच्या सोईसाठी ही कारवाई केल्याचे, वाहतूक शाखेचे पालीस निरिक्षक नितीन गोकावे यांनी यावेळी सांगितले.

कारवाई केलेली ठिकाणे

सेवाधाम ते प्रवेशव्दार क्रमांक चार हा रस्ता, एसबीआय बँकेजवळील प्रमुख रस्ता, विठ्ठलरखुमाई मंदिर रस्ता, पालखी रोड, व्दारकामाई रोड अशा ठिकाणी ही धडक कारवाई करण्यात आलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details