अहमदनगर - नुकतेच राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेले प्राजक्त तनपुरे यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची सदिच्छा भेट घेतली. अण्णा हजारे यांनी निर्भया प्रकरणातील दोषींना त्वरित फाशी द्यावी, या मागणीसाठी गेल्या 20 डिसेंबर पासून मौनव्रत आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदी वर्णी लागलेले राहुरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भेट घेतली.
राज्यमंत्री तनपुरे यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट.. - प्राजक्त तनपुरे
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांची ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यानंतर समाजसेवक अण्णांचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी शनिवारी राळेगणसिद्धी येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली.
राज्यमंत्री तनपुरे यांनी घेतली अण्णां हजारे यांची भेट..
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे भाचे प्राजक्त तनपुरे यांची ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. त्यानंतर त्यांनी शनिवारी समाजसेवक अण्णा हजारे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी राळेगणसिद्धी येथे त्यांची सदिच्छा भेट घेतली. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जो विश्वास टाकला आहे. त्याला तडा न जाऊ देता जनतेची कामे करू, असे तनपुरे यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.