महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राहुरीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; ३६ हजार रूपयांच्या मुद्देमालासह १ आरोपी अटकेत - Gangasuman Hotel

राहुरीमधील वांबोरी गावातील गंगासूमन हॉटेलवर आज राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाने छापा टाकून ३६ हजार रूपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक केली.

राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आणि आरोपी

By

Published : Apr 23, 2019, 8:41 PM IST

अहमदनगर - लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुरीमध्ये राज्य उत्पादक शुल्कच्या भरारी पथकाने आज मोठी कारवाई केली. यावेळी वांबोरीतील गंगासूमन हॉटेलवर छापा टाकून ३६ हजार रूपयांच्या मुद्देमालासह एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आणि आरोपी

राहुरीतील वांबोरीमधील गंगासूमन या हॉटेलवर आज पोलिसांनी छापा टाकला. यावेळी मॅगडॉल नंबर वन व्हिस्कीचे ४ बॉक्स, ईम्परियल ब्लू व्हिस्कीचा १ बॉक्स, अशा एकूण १८० मिलीच्या २४० बाटल्यांसह ३६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहळ, अधीक्षक पराग नवलकर, उपअधीक्षक चंद्रकांत निकम, निरीक्षक सुरज कुसळे, दुय्यम निरीक्षक प्रकाश आहिरराव, कैलास छत्रे, शिवनाथ भगत, अभिजीत लिचडे, जवान राजेश कदम, प्रविण साळवे, भिमराज चत्तर आणि विजय पाटोळेंनी ही कारवाई केली.

ABOUT THE AUTHOR

...view details