शिर्डी (अहमदनगर) - शिर्डी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या बिअर शॉपीच्या गोडवूनवर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैद्यरित्या साठवून ठेवलेल्या बिअर आणि वाईनचा साठा जप्त केला. 996 बॉक्स जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 27 लाख रुपये आहे.
बिअर, वाईनचे 27 लाखांचे 996 बॉक्स कारवाईत जप्त - nagar latest news
पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या बिअर शॉपीच्या गोडवूनवर छापा टाकत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैधरित्या साठवून ठेवलेल्या बिअर आणि वाईनचा साठा जप्त केला.
कोरोनामुळे संपूर्ण भारतभर 30 एपिलपर्यंत लॉकडाऊन आहे. निमगाव निघोज येथील आनंद बिअर शॉपीच्या पाठीमागील बाजूस पत्राशेड गोडाऊनमध्ये अवैधरित्या नामांकित कंपनीच्या बिअर आणि वाईनचा मोठ्या प्रमाणात विक्रीकरिता साठा करून ठेवलेला असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून नगरच्या राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी छापा टाकत बिअर आणि वाईनचे मिळून 996 बॉक्स, असा रुपये 27 लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी योगेश नंदकुमार कडलग याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्यास अटक करण्यात आली आहे.