अहमदनगर -सर्वसामान्यांची लाडकी. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी, अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. एसटी 75 वर्षे पूर्ण करताना एक अतिशय पुरोगामी निर्णय घेत आहे. एसटी महामंडळाकडून इलेक्ट्रिक बसची ( Shivai electric bus Ahmednagar ) सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून अहमदनगर ते पुणे या मार्गवर ही एसटी सेवा सुरू झाली. 1 जून 1948 साली सार्वत प्रथम धावणाऱ्या एसटी बसचे वाहक लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते नगरमध्ये या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. 'शिवाई' असे या बसचे नाव आहे.
Shivai electric bus Ahmednagar : एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत, अहमदनगर ते पुणे या मार्गवर धावली - shivai electric bus news Ahmednagar
सर्वसामान्यांची लाडकी. ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी लालपरी, अर्थात एसटी महामंडळ आज अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. एसटी 75 वर्षे पूर्ण करताना एक अतिशय पुरोगामी निर्णय घेत आहे. एसटी महामंडळाकडून इलेक्ट्रिक बसची ( Shivai electric bus Ahmednagar ) सेवा सुरू करण्यात आली आहे. आजपासून अहमदनगर ते पुणे या मार्गवर ही एसटी सेवा सुरू झाली.
![Shivai electric bus Ahmednagar : एसटी महामंडळाची इलेक्ट्रिक बस आजपासून प्रवाशांच्या सेवेत, अहमदनगर ते पुणे या मार्गवर धावली shivai electric bus Ahmednagar](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15443086-thumbnail-3x2-op.jpg)
एसटी महामंडळ 75 व्या वर्षात पदार्पण करत आहे. प्रवाशांच्या सेवेसाठी, हे ब्रीदवाक्य जपत एसटीने सामान्यांची अविरत सेवा 75 वर्षे केली. काही महिन्यांपूर्वी झालेले आंदोलन, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, प्रवाशांचे हाल या गोष्टींचे गालबोट या अमृत महोत्सवी सोहळ्याला लागले आहे. अहमदनगर - पुणे मार्गावर 1 जून 1948 या दिवशी पहिली एसटी बस धावली होती. त्यावेळी त्या बसचे तिकीट अडीच रुपये एवढे होते. लक्ष्मण केवटे हे त्याचे वाहक होते, तर किसनराव राऊत हे त्या बसचे चालक होते. पहिल्या बसने 33 प्रवाशांनी नगर पुणे असा प्रवास केला होता.
हेही वाचा -Shani Janmotsav : शिंगणापुरात शनीदेवाचा जन्मोत्सव उत्साहात