अहमदनगर : जिल्ह्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्याबाबत बऱ्याचदा पोलिसांच्या कामावरही शंका उपस्थित करण्यात आली आहे. मात्र, चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ पाहून पोलिसांनीही कठोर पावलं उचलायला सुरूवात केली आहे. यामध्ये आता श्रीगोंदा शहरात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. येथे तब्बल सात मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत सुमारे दोन लाख सादोतीस हजार (२,३७,०००/-) रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल : दिनांक २१ डिसेंम्बर रोजी ललित सुभाष गुगळे (रा. श्रीगोंदा) यांनी पोलीस स्टेशन श्रीगोंदा येथे फिर्याद दिली होती. (दि. १९ डिसेंबर)रोजी आज्ञात चोरट्याने त्यांच्या राहत्या घरासमोरुन एच एफ डिलक्स मोटारसायकल चोरुन नेली आहे. या फिर्यादिवरून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सापळा लावून आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्याकडो होते.
सापळा रचून केली कारवाई : या गोष्टींबद्दल पोलिसांना या गोष्टीची गुप्त माहिती मिळाली होती. यामध्ये संशयित आरोपी रविंद्र विठ्ठल पवार (रा. साळवणदेवीरोड श्रीगोंदा) याने चोरली आहेत. तो श्रीगोंदा बस स्टँजवर येणार आहे. त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांना श्रीगोंदा बस स्टँड येथे सापळा लावून श्रीगोंदा येथील बस स्टँडवर (दि. १३ जानेवारी)रोजी सापळा लावून संशयीत व्यक्तीस रविंद्र विठ्ठल पवार (रा साळवनदेवीरोड) याला ताब्यात घेतले. दरम्यान, त्याच्याकडे मोटर सायकल चोरीबाबत कसून चौकशी करण्यात आली आहे.
या अगोदरही चोरीच्या घटना : यामध्ये या व्यक्तीकडून एच.एफ डिलक्स (एम.एच.16 ऐ के 2666) मोटर सायकल व इतर गुन्हातील चोरी केलेल्या सहा मोटर सायकल असा एकूण (२,३७,०००) रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे. सात मोटर सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरोपीवर वाहन चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. यामध्ये आता त्याच व्यक्तीकडून अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यामुळे या व्यक्तीने जे आजपर्यंत गुन्हे केले आहेत त्याची पोलखोल होत आहे.
हेही वाचा :Kidnapping : मार्केटयार्डातील अपहरणाचा मास्टरमाईंड निघाला सरपंच, खंडणीसाठी तिघांचे केले होते अपहरण