महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मिस्टर एशिया विजेता शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाडचा शॉक लागून मृत्यू; महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - अहमदनगर

पाऊस-वाऱ्यामुळे खिडकीला लटकताना वायरचे स्पार्किंग व्हायचं. म्हणून अजिंक्य पाहायला गेला. तिथे टीव्हीचे बोर्ड होते. चुकून त्याचा हात ग्रिलला लागला आणि चारही बोटं चिकटली. जोराचा धक्का बसला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत पूर्णपणे एमएसईबी आणि केबल चालकाची चूक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

http://10.10.50.85//maharashtra/08-September-2021/mh-ahm-01-sportsman-ajinkya-elec-shock-death-pkg-7204297_08092021090140_0809f_1631071900_402.jpg
अजिंक्य गायकवाडचा शॉक लागून मृत्यू

By

Published : Sep 8, 2021, 10:49 AM IST

Updated : Sep 8, 2021, 4:52 PM IST

अहमदनगर- अहमदनगरचा युवा शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाड याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. घरातील खिडकीच्या ग्रीलला बांधलेल्या टीव्ही केबलमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता. त्याच वेळी अजिक्यचा खिडकीच्या ग्रीलला स्पर्श झाल्याने तो विद्युत प्रवाहाच्या संपर्कात येऊन त्याचा जागेवरच मृत्यू झाला. 31 ऑगस्टला सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती अजिंक्यचे वडील सुरेश गायकवाड यांनी दिली आहे.

अशी घडली घटना-


अजिंक्यचे वडील या घटनेची माहिती सांगतना म्हणाले की, 31 ऑगस्टच्या संध्याकाळी पाच वाजता अजिंक्य त्याच्या आईसोबत सोफ्यावर बोलत बसला होता. हॉलमध्ये चुर-चुर असा बारिक आवाज येत होता. केबल हायटेन्शन वायर घरामध्ये आली होती. खिडकीला ती लटकत होती. आमच्याही लक्षात नाही, की तिथे विद्युत प्रवाह उतरेल. आमच्या घरामध्ये डिश होती, त्यामुळे त्या केबलचा मी कधीच उपयोग केलेला नाही. पाऊस-वाऱ्यामुळे खिडकीला लटकताना वायरचे स्पार्किंग व्हायचं. म्हणून अजिंक्य पाहायला गेला. तिथे टीव्हीचे बोर्ड होते. चुकून त्याचा हात ग्रिलला लागला आणि चारही बोटं चिकटली. जोराचा धक्का बसला आणि त्याचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेत पूर्णपणे एमएसईबी आणि केबल चालकाची चूक असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

मिस्टर एशिया विजेता शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाडचा शॉक लागून मृत्यू; महावितरणवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

मिस्टर वर्ल्डसह अनेक कार्यक्रमात सहभागी आणि लोकप्रिय-


अंजिक्य हा प्रवरा पब्लिक स्कुल मधे शिकलेला होता. शरीर सौष्ठव मधे त्याला विशेष रस होता. गोळा फेकीत तो अंडर फोर्टिन राष्ट्रीय स्पर्धेत गोल्ड मेडिलिस्ट होता. पुण्याच्या क्रीडा प्रबोधिनीत त्याने पाच वर्षे प्रशिक्षण घेतले होते. स्पोर्ट आथोरिटी ऑफ इंडिया (साई) मध्ये जिथे ऑलम्पिकचे खेळाडू तयार होतात या ठिकाणी 6-7वर्षे प्रशिक्षण घेतले होते. तसेच गेल्याच वर्षी त्याने मिस्टर एशिया 'किताब जिंकला होता. अजिंक्य गायकवाडच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अजिंक्य वेगवेगळ्या खेळात निपुण होता. 2019 मध्ये त्याने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्यचे मित्र आणि फॉलोवर्स यांना मोठा धक्का बसला असल्याचे भाऊ अजित गायकवाड यांनी दुःखी अंतकरणाने सांगितले.

माझ्या साहेबांचे सरकार, तरीही माझ्यावर ही वेळ याचं दुःख-


अजिंक्यचे वडील सुरेश गायकवाड हे शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते आहेत, तसेच ते माजी नगरसेवक देखील आहेत. माझा मुलगा गेला, तो काही परत येणार नाही. हरहुन्नरी मुलगा गेला. कोणत्याही मात्या-पित्यावर ही वेळ येऊ नये. शासनाने हे प्रकार बंद केले पाहिजेत. अजूनही प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क करून साधी चौकशी पण केली नाही. शिवसेनेसाठी मी आयुष्य वेचले, उद्धव साहेबांनी यात लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा. माझं सरकार असून माझ्यावर ही वेळ आली, याचंच मला दुःख वाटतं” अशा भावना अजिंक्यच्या वडिलांनी व्यक्त केल्या आहेत.


सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा-

महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. 11 के व्ही ओव्हर हेड वायरवरून आलेल्या केबल टीव्ही वायरमधून हा विजेचा करंट आला. हा करंट खूप जास्त होता. त्यामुळे शॉक बसल्याने तो वायरला चिकटून राहिला. केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. जागरूक मंचच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत पोलीस कारवाईची मागणी केली असून याबाबत संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करण्यात येणार आहे.

Last Updated : Sep 8, 2021, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details