अहमदनगर -शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवरून दिल्लीहून आलेले स्पाईस जेटचे विमान खाली घसरले. आज दुपारी साडेचार वाण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान विमानातील सर्व १६२ प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले आहे.
शिर्डी विमानतळाच्या धावपट्टीवरून स्पाईस जेटचे विमान घसरले, साडेतीन तासानंतर प्रवाशी सुखरूप बाहेर - शिर्डी
शिर्डी विमानतळावर आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास विमान उतरताना धावपट्टीहून खाली घसरले. या विमानात तब्बल साडेतीन तास प्रवाशी अडकलेले होते. त्यानंतर ७ वाजून ४० मिनिटांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढले
दिल्ली विमानतळावरून शिर्डीकडे येणारे स्पाईस जेटचे विमानचा वेळ दुपारी १२ वाजताची होती. मात्र, काही कारणाने हे विमान दुपारी अडीच वाजता दिल्ली विमानतळावरून निघाले. आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास शिर्डी विमानतळावर उतरताना धावपट्टीहून खाली घसरले. या विमानात तब्बल साडेतीन तास प्रवासी अडकलेले होते. त्यानंतर ७ वाजून ४० मिनिटांनी सर्व प्रवाशांना बाहेर काढले, असल्याची माहिती प्रवासी दीक्षा यांनी दिली.
विमान धावपट्टीवरून खाली घसरल्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही मुंबईहून शिर्डीला आलेले विमान धावपट्टीवरून खाली घसरले होते.