महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ahmednagar Accident : भरधाव बसची दुचाकीला जोरात धडक; दुचाकीवरील एक ठार, दोन गंभीर

अहमदपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या घटना वाढतच असून, आज पुन्हा लोखंडी सावरगावजवळ अपघाताची घटना घडली. भरधाव वेगातील एसटी बसने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात दुचाकी व बस यांच्यात समोरासमोर झाला. संजय अंकुश डहाणे (वय 50, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.

Speeding Bus Hit a Bike Hard; One Killed, Two Seriously on Bike
भरधाव बसची दुचाकीला जोरात धडक; दुचाकीवरील एक ठार, दोन गंभीर

By

Published : Jan 18, 2023, 11:08 PM IST

अहमदनगर : अंबाजोगाई तालुक्यातील कोदरी येथील संजय डहाणे, रवींद्र दगडू जाधव (वय 53 ) आणि बालासाहेब शेषेराव कदम (वय 47 ) हे तिघेजण अंबाजोगाईहून गावाकडे दुचाकीवरून (एमएच 44 एन 4352) निघाले होते. ते लोखंडी सावरगावच्या पेट्रोल पंपाच्या पुढे आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या औरंगाबाद-अंबाजोगाई एसटी बसने (एमएच 20 बीएल 0514) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.

आंबेजोगाई येथे प्राथमिक उपचारांसाठी दाखल :या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने 'स्वामी रामानंद तीर्थ' रुग्णालय आंबेजोगाई येथे प्राथमिक उपचारांसाठी दाखल केले असता तिथे उपचार सुरू असताना संजय डहाणे यांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

या महामार्गावर अपघात होऊन अनेक निष्पाप नागरिकांचा बळी :राष्ट्रीय महामार्गाच्या कंत्राटदाराने या रस्त्यावरील काही कामे अपूर्ण ठेवले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. चार दिवसांपूर्वीच या ठिकाणी फोर्म्युनर आणि रिक्षाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details