अहमदनगर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्या वॉर्डमधील भिंतींवर छोटा भीम, रेल्वे, अंकगणित, हत्ती,जिराफ अशी रंगेबिरंगी आकर्षक चित्रे रेखाटून मुले हसती-खेळती राहावीत असे वातावरण केले आहे. संपूर्ण वॉर्डला शाळेचा लूक दिला आहे. तसेच मनमोहक विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
कर्जतमधील उपजिल्हा रुग्णालयात जंगली प्राण्यासह विलगीकरणात अवतरला छोटा भीम - corona third wave
कोरोना रुग्णांसाठी कर्जत, गायकरवाडी, मिरजगाव, राशीन या ठिकाणी विलगीकरण कक्षाचे नियोजन केले होते. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुले अधिक संख्येने बाधित होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शालेय मुलांसाठी खास विलगीकरण कक्ष तयार केला आहे.
चित्रे रेखाटणारे कलाकार तालुक्यातीलच
-कर्जत तालुक्यातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांवर लक्ष ठेवणारे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कुंडलिक अवसरे , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांचे सहकार्य लाभले. याचबरोबर चित्रकार रामदास फुले(गायकवाडी), मनोज सोनवणे(वडगाव तनपुरे), हरीचंद्रफणसे(लोणी मसदपूर) यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. आणि विशेष बाब म्हणजे हे सर्व कलाकार कर्जतमधीलच आहेत.
हेही वाचा -नागपुरात महिला होमगार्डशी अश्लील वर्तन; पोलीस निरीक्षक अशोक मेश्राम निलंबित