अहमदनगर - शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. परंपरेनुसार पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करून उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात आली.
अहमदनगर : ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा - इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती
शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री विशाल गणपती मंदिरात उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा आज सकाळी मोठ्या उत्साहात पार पडली. परंपरेनुसार पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करून उत्सवमूर्तीची स्थापना करण्यात आली.
अहमदनगर : ग्रामदैवत श्री विशाल गणेशाची जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा
श्री विशाल गणेश हे शहराचे ग्रामदैवत असून विशाल गणपतीची मूर्ती अकरा फूट उंच आहे. यावेळी ढोल-ताशांचे पथकांचा गजरही गणेश मंदिराच्या परिसरात अनुभवायला मिळाला. दरम्यान, 8 सप्टेंबर रोजी मंदिरात सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाचे आयोजनही करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ट्रस्टच्या वतीने इतरही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके, देवस्थानचे अध्यक्ष अभय आगरकर आदी उपस्थित होते.
Last Updated : Sep 2, 2019, 6:09 PM IST