शिर्डी -नेहमी आपल्या वेगळ्यावेगळ्या भुमिकेमुळे चर्चेत राहणारा अभिनेता सोनू सूद शिर्डी दौऱ्यावर होता. आज ( 5 मे ) शिर्डीहून अंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जातांना सोनू सूद एक रसाचे दुकान चालवताना दिसला आहे. एवढेच नाही तर स्वत: आपल्या हाताने रस काढून मित्रांना दिल्याचा व्हिडिओ सोनू सूदने ट्विट केला ( Sonu Sood Offering Sugar Cane Juice ) आहे.
शिर्डीहून काकडी येथे विमानतळावर जातांना रस्त्याच्या कडेला असणाऱ्या साईकृष्णा या दुकानावर सोनू सूद थांबला होता. या दुकानात अनेक वस्तु मिळतात तसेच दुकानाच्या बाहेर एका बाजुला चहा तर दुसऱ्या बाजुला रसवंतीही आहे. सोनू सूदने दुकानातुन बाहेर येत त्याच्याबरोबर असलेल्या कोपरगावातील विनोद राक्षे आणि शिर्डीतील आरीफ भाईंना काय पाहिजे विचारले असता त्यांनी रसाची मागणी केली.