महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करणार्‍या सोनार बाबाचा नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू - तोफखाना पोलीस ठाणे

अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य (committed unnatural acts with a minor) करणार्‍या सोनार बाबाला स्थानिक नागरिकांनी मारहाण केल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला ( Sonar Baba was beaten to death by civilians) आहे. यामुळे मारहाण करणार्‍यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Thane) खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

fatal death
नागरिकांच्या मारहाणीत मृत्यू

By

Published : Jun 9, 2022, 10:57 PM IST

अहमदनगर :चार वर्षाच्याअल्पवयीन मुलाला घरात घेऊन जात त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना अहमदनगर शहरातील एका उपनगरात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी पीडित मुलाच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन राजेश काशिनाथ सोनार ऊर्फ सोनार बाबा ( 55) मुळ राहणार भेंडा ता. नेवासा, हल्ली रा. गांधीनगर, बोल्हेगाव याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोमवारी रात्री महिला घरामध्ये स्वयंपाक करत असताना मुलाने त्यांच्याकडे पाच रूपयांची मागणी केली. तीने पाच रूपये देताच मुलगा घराच्या खाली असलेल्या किराणा दुकानात गेला. 10 ते 15 मिनिटे होऊन देखील मुलगा परत न आल्याने तीने त्याचा घराच्या खाली शोध घेतला असता तो दिसला नाही. त्यांना एका महिलेने सांगितले की,‘तुमच्या मुलाला सोनार बाबा घेऊन गेला आहे’, तेव्हा ती महिला सोनार बाबाच्या घरी गेल्या असता सोनार बाबा मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करत असल्याचा प्रकार उघडकीस आला.


दरम्यान घडलेल्या प्रकारानंतर महिलेने आरडाओरडा केला असता तेथे स्थानिक नागरिक जमा झाले. त्यांनी सोनार बाबाला मारहाण केली. ( Sonar Baba was beaten to death by civilians) मारहाणीत तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पीडित मुलाच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रूरारीवरून सोनार बाबाविरूध्द अनैसर्गिक अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रियंका आठरे करीत आहेत. तर सोनार बाबाच्या मृत्यूमुळे मारहाण करणार्‍यांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ABOUT THE AUTHOR

...view details