अहमदनगर - जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचा राज्यातही दिवसें दिवस प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. राज्यात १ हजार २००च्या वर लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात जीवनावश्यक सोडून बाकीची सगळी दुकाने बंद आहेत. सलूनचीही दुकाने बंद असल्याने केस कापायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच, एका आमदार पुत्राने आपल्या वडिलांची घरीच कटिंग केली आहे. या घटनेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
लॉकडाऊन : आमदार पुत्राने स्वत: च कापले वडिलांचे केस - आमदार सुधीर तांबे न्यूज
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. अशात जीवनावश्यक सोडून बाकीची सगळी दुकाने बंद आहेत. सलूनचीही दुकाने बंद असल्याने केस कापायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच, एका आमदार पुत्राने आपल्या वडिलांची घरीच कटिंग केली आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांची त्यांचे पुत्र महाराष्ट्र युवक काँग्रसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कटिंग केली आहे. याचे फोटो त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत. लॉकडाऊनमुळे केस कापायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे? यावर आम्ही घरगुती पर्याय शोधला व मी स्वत: च माझ्या पप्पांचे केस कापल्याचे सत्यजित म्हणाले. लहानपणापासून आमचा नेहमीचा हेअर ड्रेसर द्वारका पवार याचे काम पाहून मला कायम वाटायचे, की केस कापणे म्हणजे सोपं काम. नेहमी केस कापणाऱ्याला सूचना... असे काप... तसे काप! आज पप्पांचे केस कापतांना एका गोष्टीची जाणीव झाली... जगात कुठलेच काम सोपे नाही.. आणि कामापेक्षा मोठा कोणता धर्म नाही, असे सत्यजीत तांबे म्हणाले. सोबत मदतीला मुलगी अहिल्या होती, असे तांबेंनी म्हटले आहे.