महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Solapur rain : फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली धास्ती - पंढरपूर

पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी अशा फळबागायतीची अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशा वाया गेल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे.

Solapur rain
Solapur rain

By

Published : Nov 23, 2021, 10:37 PM IST

सोलापूर - जिल्ह्यात आठ दिवसापासून अवकाळी पावसाने जोरदारपणे हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाचा फटका हा शेतकऱ्यांच्या फळ बागायती शेतीला बसला आहे. पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, माळशिरस तालुक्यातील डाळिंब, द्राक्ष, केळी अशा फळबागायतीची अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक अक्षरशा वाया गेल्याचे चित्र सोलापूर जिल्ह्यात दिसून येत आहे. माळशिरस तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बाग उपटून टाकण्याची वेळ आली आहे. फळबागेत शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी घेतली धास्ती

सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस
सोलापूर जिल्ह्यामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पावसाला सुरुवात झाली होती. सोलापूर जिल्ह्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावर्षी 104 टक्के पावसाची हजरी सोलापूर जिल्ह्यामध्ये लागली आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये मोहोळ, बार्शी, मंगळवेढा, अक्कलकोट तालुक्यात सरासरी 110 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर उर्वरित तालुक्यांमध्ये शंभरपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

सततच्या पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला
सोलापूर जिल्ह्यामध्ये साधारणपणे ऊस शेतीवर भर दिला जातो. त्याचबरोबर फळबाग शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. यामध्ये पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा तालुक्यांमध्ये द्राक्ष डाळिंब केळी यांच्यासह इतर फळबागायती लागवड केली जाते. यातून शेतकऱ्यांना उत्पन्नाची अपेक्षा असते. मात्र गेल्या चार महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस बरसला आहे. त्यामुळे फळ बागायत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाल्याचे चित्र पाहायला मिळतात.

शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
पंढरपूर, सांगोला, माळशिरस तालुका द्राक्ष बागायतदार म्हणून प्रसिद्ध आहे. या तालुक्यातील द्राक्ष देशातील विविध कानाकोपऱ्यात मध्ये जात असतात. तीन दिवसाच्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष फळबागाचे नुकसान झाले आहे माळशिरस तालुक्यातील मासाळ शेतकऱ्याच्या शेतातील तोडणीस आलेली द्राक्ष अवकाळी पावसामुळे अक्षरशा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यातील गळकुज होणाच्या मार्गावर द्राक्ष बाग होत आहे. यातून मासाळ यांच्या काढणीस आलेल्या द्राक्षाला व्यापाऱ्यांनीही पाठ दाखवली आहे. यामुळे मासाळ यांचे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -st workers strike : परिवहनमंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानाला जनशक्ती संघटनेचा घेराव

ABOUT THE AUTHOR

...view details