महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नळपाणी योजनेचे पाणी वाया गेल्याने सामाजिक कार्यकर्त्यांची नगरपालिकेसमोरच अंघोळ - सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप

श्रीगोंदा शहरवासियांची तहान भागविण्यासाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

नगरपालिकेसमोरच अंघोळ करताना दत्तात्रय जगताप

By

Published : May 28, 2019, 1:52 PM IST

Updated : May 28, 2019, 3:22 PM IST

अहमदनगर - बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून श्रीगोंदा शहरवासियांसाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. याचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जगताप यांनी श्रीगोंदा पालिका कार्यालयासमोर अंघोळ करून पालिकेच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला.

नळपाणी योजनेची माहिती सांगताना उपनगराध्यक्ष आणि दत्तात्रय जगताप

पाचपुते यांच्या प्रयत्नातून घोड धरणातून सुमारे ५० कोटी रुपये खर्च करुन श्रीगोंदा शहरवासियांची तहान भागविण्यासाठी नळपाणी योजना तयार करण्यात आली. मात्र, या योजनेला ऐन दुष्काळात मोठी गळती लागली आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या पाईपला शहरात अनेक ठिकाणी ‘एअर वॉल’ काढले नसल्याने वितरण व्यवस्थेतील पाईप लीक होऊन लाखो लिटर पाणी वाया जात आहे, असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पालिका प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करत असल्याने गेले १० दिवस पालिकेकडून पाणी न मिळाल्याचा आरोप करुन दक्ष नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष जगताप यांनी पालिका कार्यालया समोरच अंघोळ करुन पालिका प्रशासनाचा निषेध केला.

शहरात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या जल वाहिन्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात ठिक ठिकाणी एअर वॉल बसविणे अपेक्षित असताना कसल्याही प्रकारचे नियोजन न करता शहरात पाईप टाकण्यात आल्या. तसेच पाण्याचा नेमका दाब किती, हे कर्मचाऱ्यांना समजत नाही. यामुळेच पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप पाणी सुटले की फुटत असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या पाण्याचे शुध्दीकरण करण्यात आले आहे. शुध्द केलेले पाणी, विजेचा वापर आणि दुष्काळात या पाण्याचा अपव्यय हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. मात्र, तरीही नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप होऊ लागला आहे.

तांत्रिक अडचणीमुळे वितरण व्यवस्थेतील काही पाईप लीक होत असले तरी त्यावर कायमस्वरुपी उपाय योजना करण्यात येणार आहे. नागरिकांनी संयमाची भूमिका घेऊन पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी केले आहे.

Last Updated : May 28, 2019, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details