महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांच्यावर जीवघेणा हल्ला... दोन फरार आरोपी जेरबंद

Heramb Kulkarni : सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणातील इतर दोन आरोपी फरार होते. त्यांना मंगळवारी तोफखाना (Tofkhna Police) पोलिसांनी अटक केली आहे.

Heramb Kulkarni
दोन फरार आरोपी जेरबंद

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 11, 2023, 9:02 PM IST

अहमदनगरHeramb Kulkarni: सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सोमवारी अटक केली. हेरंब कुलकर्णी यांच्यावर शनिवारी अहमदनगर शहरात काही अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. घटनेच्या सीसीटीव्ही व्हिडीओद्वारे कारवाई करत पोलिसांनी आरोपींना अटक केली. त्यानंतर आज बुधवारी बाकीच्या दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे.

13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी :तोफखाना पोलीस स्टेशन (Tofkhna Police Station) मध्ये दाखल गुन्ह्यात फरार असलेले आरोपी सनि ज्ञानेश्वर जगधने (वय 24 वर्षे रा. रंगभवन सर्जेपुरा), तसंच अक्षय कैलास माळी (वय 20 वर्षे रा. सर्जेपुरा) यांना तोफखाना पोलिसांनी सापळा लाऊन अटक केली. त्यांना न्यायालया समोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 13 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.


यांनी केली कामगिरी : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडें यांचे मार्गदर्शनाखालील पो.नि. मधुकर साळवे, पो.उपनिरी सचिन रणशेवरे, पोहेकॉ दत्तात्रय जपे, पोहेकॉ सुनिल शिरसाट, पोना संदिप धामणे, पोना अविनाश वाकचौरे, पोना वसीम पठाण, पोना अहमद इनामदार, पोना सुरज वाबळे, पोकॉ सचिन जगताप, पोकॉ शिरीष तरटे, पोकाॅ भवर, पोकॉ सतिष त्रिभुवन, संदिप गि-हे, पोकॉ बाळासाहेब भापसे, दत्तात्रय कोतकर, गौतम सातपुते, सतिष खोमणे यांनी केली असून तांत्रिक मदत पोकाॅ राहुल गुंडू पुढील तपास मपोसई शुभांगी मोरे या करत आहेत.

काय आहे प्रकरण : हेरंब कुलकर्णी ज्या महाविद्यालयात मुख्याध्यापक आहेत, त्या महाविद्यालच्या शेजारी अक्षय सब्बन या आरोपीची पान टपरी होती. या पान टपरीबाबत त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज केला होता. त्यानंतर पालिकेनं कारवाई केली. या कारवाईचा राग मनात धरून अक्षय सब्बन यानं हेरंब कुलकर्णी यांच्यावर त्याच्या पाच साथीदारांसह हल्ला केला होता.

दोन आरोपी फरार : या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शनिवारी कलम ३२४, ३४१ आणि ३२३ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र कुलकर्णी यांना लोखंडी रॉडनं मारहाण झाली असल्यानं पोलिसांनी दाखल गुन्ह्यामध्ये कलम ३०७ जोडला. पोलिसांनी अहमदनगर शहरातील कोंड्यामामा चौकात आरोपीला अटक केली होती. आरोपींमध्ये अक्षय सब्बन, चैतन्य सूडके आणि एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. राज ठाकरेंनी महसूल वाढीसाठी सुचवलेली सूचना असंवेदनशील - हेरंब कुलकर्णी
  2. "परीक्षा रद्द करण्याची मागणी केली नसतानाही घाई कशासाठी"
  3. Herambh Kulkarni : हेरंब कुलकर्णी यांना मारहाण करणाऱ्या तिघांना फिल्मी स्टाइलनं अटक, दोघे फरार

ABOUT THE AUTHOR

...view details