अजब शक्कल.. रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी; दोन आरोपीसह दारू, रुग्णवाहिका जप्त - रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी
रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 23 हजार 500 रुपयाच्या देशी दारूसह रुग्णवाहिका जप्त केली आहे.
![अजब शक्कल.. रुग्णवाहिकेतून देशी दारूची तस्करी; दोन आरोपीसह दारू, रुग्णवाहिका जप्त Smuggling of liquor](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11522003-699-11522003-1619257340570.jpg)
अहमदनगर - रुग्णवाहिकेतून देशी दारूची वाहतूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरात समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 23 हजार 500 रुपयाच्या देशी दारूसह रुग्णवाहिका जप्त केली आहे.
संगमनेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. दारूची दुकाने बंद असतानाही तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दारूची विक्री केली जात आहे. दोघा युवकांनी शुक्रवारी सकाळी दहा वाजता संगमनेर शहरातीलच एका दारूच्या दुकानातून ही दारू त्यांनी घेतली. संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथे देशी दारू नेण्यात येणार होती.