महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साई मंदिर परिसरातील 'हा' आकाश कंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र - Kopargaon Mukhbadheer School News

दिवाळी निमित्त शिर्डीतील साईबाबा मंदिरही विविध आकाश कंदीलांनी सजले आहे. यात साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आलेला २१ फुट उंच आणि १४ फुट रुंद अशा इकोफ्रेंडली आकाश कंदिलाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

कंदील

By

Published : Oct 26, 2019, 5:43 PM IST

Updated : Oct 27, 2019, 12:52 PM IST

अहमदनगर- दिवाळी निम्मित्त सर्वत्र आकाशकंदील लावले जात आहे. शिर्डीतील साईबाबा मंदिरही विविध आकाश कंदिलांनी सजले आहे. यात साईबाबा मंदिर परिसरात लावण्यात आलेला २१ फुट उंच आणि १४ फुट रुंद अशा इकोफ्रेंडली आकाश कंदिलाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

साईबाबा समाधी मंदिर परिसरात भक्तांनी भेट दिलेले विविध आकाश कंदील लावण्यात आले. यात कोपरगावच्या मुकबधीर शाळेतील मुलांनी बनविलेला भव्य आकाश कंदील देखील लावण्यात आला आहे. त्याला पहाण्यासाठी अनेक भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली आहे. तसेच हा सुंदर कंदील बनविल्याबद्दल भाविकांकडून मुलांचे कौतुक केले जात आहे. हा भव्य आकाश कंदील बनविण्यासाठी मुलांना विद्यालयाचे चित्रकला शिक्षक रवींद्र कांबळे यांच्यासह इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.

साई मंदीर परिसरातील 'हा' आकाश कंदील ठरतोय आकर्षणाचे केंद्र

त्याचबरोबर, आकाश कंदील बनविण्यासाठी शिर्डीतील शिलधी प्रतिष्ठाणाने आर्थिक मदत केली आहे. धनत्रयदशी आणि वसूबारसच्या मुर्हूतावर शाळेतील विद्यार्थी सुभाष चौधरी, तेजस बिडवे, भागवत शिंदे, तेजस्विनी सुरभैय्या, कोमल व्यास राहील शेख, प्रतिक्षा संगवे यांनी बनविलेला हा इकोफ्रेंडली आकाश कंदील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा-कर्जत-जामखेडमध्ये नवे 'रोहित'पर्व, भाजपच्या राम शिंदेंचा दारुण पराभव

Last Updated : Oct 27, 2019, 12:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details