अहमदनगर-जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये शनिवारी १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. त्याचबरोबर खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत ४७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे दिवसभरात एकूण ६३ रुग्ण कोरोना रुग्ण वाढले आहेत. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित वाढण्याची पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यात शनिवारी ३९ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
जिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील ३, नेवासा तालुक्यातील १, जामखेड तालुक्यातील १ आणि पुणे जिल्ह्यातील १ रुग्ण आढळून आला आहे.
संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील ५, नवघर गल्ली येथील १ तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील ०२, खांडगाव, , चिखली येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला आहे. नेवासा तालुक्यातील गुंडगाव येथील एक, जामखेड तालुक्यातील लोणी (पोस्ट - खर्डा) येथील एक रुग्ण बाधित आढळले आहेत.
नगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.विश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४७ रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३४, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०२, राहाता ०३, संगमनेर ०४ आणि श्रीरामपूर येथे ०२ रुग्ण बाधित आढळले आहेत.