महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विखे-जगताप भवितव्य ईव्हीएममध्ये बंद.. ६४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान - sujay vikhe

राज्यातील प्रमुख लढतीत एक लक्षवेधी असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील प्रमुख उमेदवार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांचे जय-पराजयाचे भवितव्य काल (मंगळवारी) मतदान यंत्रात बंद झाले.

अहमदनगर लोकसभा

By

Published : Apr 24, 2019, 8:16 AM IST

अहमदनगर- राज्यातील प्रमुख लढतीत एक लक्षवेधी असलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीतील प्रमुख उमेदवार डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांचे जय-पराजयाचे भवितव्य काल (मंगळवारी) मतदान यंत्रात बंद झाले. नगर दक्षिण मतदारसंघातील १९ उमेदवारांसाठी आज ६४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने सायंकाळी दिली असली तरी बुधवार सकाळपर्यंत निवडणूक प्रशासनाने अंतिम आकडेवारी घोषित केलेली नव्हती.

मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदारसंघातील २ हजार ३० मतदान केंद्रांवर ९ हजार कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त होता. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन बिघाडीच्या शेकडो तक्रारी प्रशासनाची डोकेदुखी ठरली. सुमारे २०० च्यावर बिघडलेली यंत्रे प्रशासनाला बदलावी लागली. दुपारी ३ वाजेपर्यंत सुमारे १७६ बिघडलेली मतदान यंत्रे बदलली असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. यात बॅलेट युनिट ५७, कंट्रोल युनिट २५ आणि व्हीव्हीपॅड ९६ अशा यंत्रांचा समावेश आहे. सायंकाळी पाचपर्यंत बिघडलेली आणखी २ टक्के मतदान यंत्रे बदल्याचे त्यांनी सांगितले.
मतदानाच्या शेवटच्या तासाभरात मतदान केंद्रावर मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे काही ठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला होता. गर्दीमुळे सायंकाळी सात वाजेपर्यंत या केंद्रांवर मतदान सुरू होते. गेल्या पंचवार्षिकला २०१४ मध्ये तेरा उमेदवारांसाठी सुमारे ६२.५ टक्के मतदान झाले होते. त्या तुलनेत यावेळी ६४ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक मतदान झाले. अंतिम मतदानाची आकडेवारी रात्री उशिरापर्यंत निश्चित होईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार-

दिवसभरात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनच्या वाढत्या बिघाडा च्या तक्रारी नंतरही प्रशासना कडून अनेक ठिकाणी वेळेत दखल न घेतल्याने मतदारांना मतदानास मुकावे लागल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्याकडे लेखी अर्जा द्वारे करण्यात आली. त्यात राहुरी विधानसभा मतदारसंघातील शिराळ चिंचोडी (ता-पाथर्डी) येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम दुपार नंतर बंद पडल्या नंतर मतदानाची वेळ संपल्यावर दुसरे मतदान यंत्र उपलब्ध झाल्याने मतदारांना मतदाना पासून वंचित राहावे लागल्याची तक्रार करत या ठिकाणी पुन्हा मतदान घेण्याची मागणी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details