महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पिचड यांना धक्का : सीताराम गायकरांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - bjp

सीताराम पाटील गायकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज मुबंई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पिचड यांना धक्का : सीताराम गायकरांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
पिचड यांना धक्का : सीताराम गायकरांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

By

Published : Mar 16, 2021, 7:17 PM IST

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व अकोले तालुक्यातील जेष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज मुबंई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, घनश्याम शेलार, आ.डॉ. किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे, सहकारातील निवृत्त अधिकारी बी जे देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, शहराध्यक्ष संपतराव नाईकवाडी, आदी उपस्थित होते.

गायकर यांच्यासह अगस्ति कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रकाशराव मालुंजकर, ज्येष्ठ संचालक गुलाबराव शेवाळे, अशोकराव देशमुख, कचरु पाटील शेटे, रामनाथ बापू वाकचौरे, बाळासाहेब ताजने, भास्कर बिन्नर, पं स चे माजी सभापती विठ्ठलराव चासकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती परबतराव नाईकवाडी, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, अमृतसागर दूध संघाचे संचालक व जनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊपाटील नवले, जि प चे माजी सदस्य कैलासराव शेळके, दूध संघाचे माजी अध्यक्ष प्रतापराव देशमुख,शरदराव चौधरी,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष भाऊसाहेब काळे, शिवसेनेचे माजी पं स सदस्य आप्पासाहेब आवारी, माधवराव भोर,विकासराव शेटे,प्रकाश नाईकवाडी,दत्तात्रय भोईर ,सुधीर शेळके आदी प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

ABOUT THE AUTHOR

...view details