अहमदनगर - नाताळच्या सुट्ट्या लागण्याआधीच शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत तब्बल एक लाखाहून आधिक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली आहे. नाताळाच्या सुट्ट्यांच्या दरम्यान या संख्येत लक्षणीय वाढ होते. त्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज झाले आहे.
नाताळाच्या सुट्ट्या लागण्याआधीच शिर्डी साई मंदिरात भाविकांची गर्दी - शिर्डी भाविकांमध्ये वाढ
शनिवारी आणि रविवारी दुपारपर्यंत तब्बल एक लाखाहून आधिक भाविकांनी शिर्डी साई मंदिराला भेट दिली आहे. रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिराला 16 लाख 73 हजारांचे दान प्राप्त झाले होते.

नाताळाच्या सुट्या लागण्याअधीच शिर्डी साई मंदिरात भाविकांचा गर्दी
दिपक मुंगळीकर, संस्थानाचे कार्यकारी अधिकारी
हेही वाचा -खळबळजनक! शिर्डीत 10 महिन्यात तब्बल 88 भाविक बेपत्ता; मानवी तस्करीचा संशय
रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मंदिराला 16 लाख 73 हजारांचे दान प्राप्त झाले होते. तसेच, मोफत दर्शन पास द्वारे 35 हजार भाविकांनी दर्शन घेतले होते. शनिवारी दिवसभरात साई संस्थानच्या प्रसादालयात 63 हजार भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला होता.