अहमदनगर- श्रीरामपूर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे. आमदार कांबळे यांनी आज विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
भाऊसाहेब कांबळे यांचा आमदारकीचा राजीनामा
श्रीरामपूर काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी काँग्रेस पक्ष सोडून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का बसला आहे.
कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्याचा पराभव झाला होता. कांबळे हे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांचे कट्टर समर्थक होते. पण, त्यांनी थोरात यांची साथ धरली होती. आज त्यांनी थोरात यांची साथ सोडली. आमदार कांबळे यांची आज सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर बैठक झाली. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, खासदार प्रताप जाधव, उद्योगमंत्री सुभाष देसाई हे उपस्थित होते.कांबळे यांना सेनेने विधानसभेची उमेदवारी देण्याचे कबूल केले असल्याचे म्हटले आहे.