महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊनमुळे कडूलिंबाच्या झाडाखाली 'शुभमंगल सावधान'! - Shrirampur Lockdown Wedding

श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील सराफ व्यावसायिक नियोजित असलेला लग्नसोहळा रद्द न करता अगदी साध्या पद्धतीने कडूलिंबाच्या झाडाखाली पार पाडला. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला.

Wedding ceremony
लग्न समारंभ

By

Published : May 3, 2020, 7:17 AM IST

अहमदनगर - कोरोनाची सध्याची परिस्थिती बघता पुन्हा लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील सराफ व्यावसायिक नियोजित असलेला लग्नसोहळा रद्द न करता अगदी साध्या पद्धतीने कडूलिंबाच्या झाडाखाली पार पाडला.

बेलापूर येथील सराफ व्यावसायिक भगीरथ चिंतामणी यांचा मुलगा योगेश आणि बुरुडगाव येथील ज्ञानेश्वर विठ्ठल कुलथे यांची मुलगी प्रज्ञा यांचा विवाह 15 एप्रिल रोजी नियोजित होता. मात्र, लॉकडाऊनमुळे विवाह करणे शक्य झाले नाही. आता पुन्हा लॉकडाऊन वाढतच असल्याने वर-वधु पित्याने मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची तयारी दर्शवली. यासाठी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहीरट यांच्याकडे परवानगी मागितली. पोलीस अधिकाऱ्यांनी मोजक्याच लोकाच्या उपस्थितीत विवाह करण्याच्या अटीवर परवानगी दिली. हा लग्नसोहळा अवघ्या पाच हजार रुपयांमध्ये झाला.

आपण मोठेपणा दाखवण्याच्या नादात कर्जबाजारी होवून लग्नसोहळे करतो. लग्नात पैशाची आणि अन्नाची उधळपट्टी करतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे आमच्या दोन्ही कुटुंबाचा फार मोठा खर्च वाचला. जो आमच्या भावी जीवनासाठी उपयुक्त ठरू शकतो. अशा प्रकारे विवाह करुन लग्नाचा वाचलेला पैसे आम्ही निश्चितच चांगल्या कार्याला लावू, अशी भावना नवविवाहितांनी व्यक्त केली.

ABOUT THE AUTHOR

...view details