महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ST Workers agitation : कोपरगावातून एसटीचा श्रीगणेशा; संप मात्र, सुरूच राहणार - अहमदनगर एसटी बातमी

कोपरगावातून आज (सोमवारी) सकाळी पहिली एसटी(ST Starts From Kopargaon) धावली आहे. कोपरगाव ते श्रीरामपूर या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. कोपरगाव बस आजारातून 630 फेऱ्या झाल्या.

st
st

By

Published : Dec 6, 2021, 5:04 PM IST

अहमदनगर -कोपरगावातून आज (सोमवारी) सकाळी पहिली एसटी(ST Starts From Kopargaon) धावली आहे. कोपरगाव ते श्रीरामपूर या मार्गावर पहिली एसटी सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार असल्याने कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत आहे. कोपरगाव बस आजारातून 630 फेऱ्या होतात. त्यापैकी 1 बस आज (सोमवारी) येथून रवाना करण्यात आली आहे.

अखेर लालपरी धावली
गेल्या काही दिवसापासून ठप्प असलेल्या एसटीची चाके आता पुन्हा गतीमान होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात हळूहळू सर्वत्र एसटी वाहतूक(St Travelling) सुरु करण्यास सुरुवात झाली आहे. कोपरगावातूनही आज सकाळी १०.३० च्या सुमारास पहिली एसटी धावली आहे. कोपरगाव -शिर्डी- श्रीरामपूर या मार्गावर पहिली एसटी पोलीस बंदोबस्तात सोडण्यात आली. विलीनीकरणाच्या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांच्यावर दुसरीकडे बडतर्फीची टांगती तलवार आहे. यामुळे कर्मचारी वर्ग संभ्रमावस्थेत आहे. मात्र विलीनीकरणाचा संप अजूनही सुरूच असून त्यावर आम्ही ठाम असल्याचे यावेळी एस टी संपकरी कर्मचारी आंदोरे देवदत्त यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details