महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अहमदनगर: श्री संत शेख महंमद महाराज हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; उत्साहात यात्रेला सुरुवात.. - shri sant shekh mahamand maharaj

श्री संत शेख महंमद महाराजांचा यात्रोत्सव सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे.

श्री संत शेख महंमद महाराजांची यात्रा
श्री संत शेख महंमद महाराजांची यात्रा

By

Published : Mar 9, 2020, 1:05 AM IST

अहमदनगर - श्रीगोंदा शहराचे ग्रामदैवत श्री संत शेख महंमद महाराजांचा यात्रोत्सव सुरु झाला आहे. दरवर्षी आमलकी एकादशीला महंमद महाराजांची यात्रा साजरी केली जाते. श्री संत शेख महंमद महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते. महंमदाला महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते. मालोजीराजे भोसल्यांनी महाराजांनी गुरू मानले होते. तसेच समर्थ रामदासांनी महंमद महाराजांवर आरती रचली आहे. योगसंग्राम पवनविजय व निष्कलंकप्रबोध या त्यांच्या प्रमुख रचना वारकरी संप्रदायात रूढ आहेत.

श्री संत शेख महंमद महाराजांची यात्रा
शेख महंमद यांच्या अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ते संत तुकारामांचे समकालीन होते. भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि धार्मिक सद्भावनेचे प्रतिक म्हणून संतकवी शेख महंमद यांच्या कार्याकडे पाहण्यात येते. यात्रेच्या निमित्ताने मठाच्या प्रांगणात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले जाते. रामनाचार्य रामरावजी ढोक महाराज व अनेक नामवंत प्रवचनकारांनी येथे सेवा बजावली आहे.यात्रोत्सवात दिवसभर भाविक दर्शनासाठी व नवसपूर्तीसाठी गर्दी करतात. सायंकाळी बाबांच्या ग्रंथाची पालखी आणि छबीना मिरवणूक निघेल. शनिवारी सायंकाळी मठाजवळ कुसत्यांचा जंगी सामना होईल. विजेत्यांना आयोजकांकडून मोठी बिदागी दिली जाईल. दोन दिवस होणाऱ्या या मुख्य उत्सवानिमित्त यात्रा उत्सव समिती व महंमद बाबा ट्रस्ट ने स्वतंत्र व्यवस्थापन केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details