महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'पन्नास खोके देणाऱ्या आणि घेणाऱ्यांना कसली आली संस्कृती' - सबनीस यांची नाराजी

Shripal Sabnis: साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर आपलं परखड मत व्यक्त केला आहे. यावेळी राजकारण्यांवर निशाणा साधत टोला लगावला आहे. लोकप्रतिनिधींना 60-60, 50-50 खोक्यांनी जर विकत घेतले जात असतील, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांना कसली संस्कृती म्हणायची, असं स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. तर सध्याची राजकीय संस्कृती अत्यंत अनाठाई प्रकारची आहे. न बोललेलं बरं अशा प्रकारचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटलंय आहे.

Shripal Sabnis
Shripal Sabnis

By

Published : Oct 20, 2022, 5:09 PM IST

अहमदनगर: साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी सध्याच्या राजकिय परिस्थितीवर आपलं परखड मत व्यक्त केला आहे. यावेळी राजकारण्यांवर निशाणा साधत टोला लगावला आहे. लोकप्रतिनिधींना 60-60, 50-50 खोक्यांनी जर विकत घेतले जात असतील, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांना कसली संस्कृती म्हणायची, असं स्पष्ट भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे. तर सध्याची राजकीय संस्कृती अत्यंत अनाठाई प्रकारची आहे. न बोललेलं बरं अशा प्रकारचा प्रकार असल्याचे त्यांनी म्हटलंय आहे. राजकीय भूमिकेमध्ये खूप चढ- उतार असून सौदेबाजी आहे. तसेच सौदेबाजीमध्ये माणूस विकला जातो आहे. उघडपणे जनता विकली जात आहे. जनतेचे प्रतिनिधी विकले जात असल्याचे श्रीपाल सबनीस म्हणाले आहे.

श्रीपाल सबनीस यांचे परखड मत

लोकप्रतिनिधींच्या वर्तनावर सबनीस यांची नाराजीनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील लिखित शूर सेनापती संताजी पुस्तकाच्या नगरमध्ये आयोजित प्रकाशन सोहळ्यास सबनीस उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सध्याच्या एकूण राजकीय परिस्थितीवर बोलताना हे वक्तव्य केले आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यातील सरकार एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कोसळले. यावर विरोधकांनी पन्नास खोके एकदम ओक्के असे म्हणत हे सरकार अर्थपूर्ण पद्धतीने कोसळल्याचे सूचित करत मोठा गदारोळ उडवला आहे.

अपेक्षा ठेवण्यात अर्थ उरला नाहीलोकप्रतिनिधी 60-60, 50-50 खोक्यांनी जर विकत घेतले जात असतील, तर देणाऱ्या आणि घेणाऱ्यांना कसली संस्कृती म्हणायची असा टोला त्यांनी राजकारण्यांना लगावला आहे. तसेच विकत घेणाऱ्यांना ही संस्कृती नाही आणि विकत देणाऱ्याला ही संस्कृती नसते, असे मत त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे राजकीय संस्कृतीचं दिवाळ वाजले आहे. या परिस्थितीत यांच्याकडून काहीही अपेक्षा नाही असा परखड मत त्यांनी मांडलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details