महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shopkeepers Corona Testing : शिर्डीत नगरपंचायतकडून दुकान मालक आणि कामगारांची कोरोना चाचणी - अहमदनगर कोरोना बातमी

व्यावसायिक आणि दुकानातील कामगारांची कोरोना चाचणी थेट दुकानातच करण्यात आली. ही मोहिम शिर्डी नगरपंचायत प्रशासना मार्फत सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम पुढील आठवडाभर सुरु राहणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे.

कोरोना चाचणी करतांना कर्मचारी
कोरोना चाचणी करतांना कर्मचारी

By

Published : Jan 4, 2022, 5:11 PM IST

Updated : Jan 4, 2022, 5:18 PM IST

शिर्डी (अहमदनगर) -नाताळ आणि नविन वर्षाच्या निमित्ताने शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे शिर्डीतील व्यावसायिकांचा अनेकांशी संपर्क आला होता. त्यामुळे खबरदारी म्हणून आजपासून (मंगळवारी) व्यावसायिक आणि दुकानातील कामगारांची कोरोना चाचणी थेट दुकानातच करण्यात आली. ही मोहिम शिर्डी नगरपंचायत प्रशासना मार्फत सुरु करण्यात आली आहे. ही मोहीम पुढील आठवडाभर सुरु राहणार असल्याची माहिती शिर्डी नगरपंचायतचे मुख्य अधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया देतांना मुख्याधिकारी
गेल्या 24 डिसेंबर ते 2 जानेवारीपर्यंत शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. यात देभरातील भाविकांचा समावेश होता. या भाविकांचा शिर्डीतील दुकानदार त्यातील कर्मचारी, हॉटेल त्यांचे वेटर यांच्याशी संपर्क आला होता. त्यामधून कोणी कोरोनाबाधित असतील तर शिर्डीतील हे व्यावसायिक बाधित होवू शकतात. त्यामुळे सुपर स्प्रेडर ठरु शकतील, म्हणून शिर्डी नगरपंचायतीच्या वतीने आजपासून शिर्डीतील व्यावसायिकांची कोरोना चाचणी करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. नगरपंचायतचे कर्मचारी प्रत्येक दुकानात जावून ही चाचणी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Last Updated : Jan 4, 2022, 5:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details