अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी येथील पुणे-नाशिक महामार्गावर राज्य परिवहन महामंडळाची शिवशाही बसला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. सुदैवाने या बसमधील 25 प्रवाशांचा जीव वाचला आहे.
शिवशाही बसने अचानक घेतला पेट, 25 प्रवासी करत होते प्रवास - शिवशाही बसने अचानक घेतला पेट
पुणे-नाशिक महामार्गावर नाशिकहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसने अचानक पेट घेतला. ही बाब वेळीच चालक व वाहकाच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ बस बाजूला घेत यातील प्रवाशांना बाहेर काढले. यामुळे सुदैवाने प्रवाशांचे प्राण बचावले.
पेटलेली शिवशाही
नाशिकहून पुण्याकडे बस (क्र. एम एच 14 जी यू 2445) संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी शिवारात येताच या बसने अचानक पेट घेतला. ही बाब वाहन व चालक अहिरे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने बस बाजूला घेत यातील प्रवाशांना बाहेर काढले. यामुळे सुदैवानं या प्रवाशांचा प्राण वाचला आहे.
हेही वाचा -'सूर्य योग्यच ठिकाणी उगवला, लवकरच मध्यप्रदेशची पुनरावृत्ती महाराष्ट्रात'
Last Updated : Mar 12, 2020, 2:50 PM IST