महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीतील शिवसैनिकांनी घेतली राज्यपाल भगतसिह कोश्यारींची भेट; विकासातील व्यथांचा वाचला पाढा - शिर्डीतील शिवसैनिकांनी घेतली राज्यपाल भगतसिह कोश्यारींची भेट

शिर्डी विकास आराखडा स्थगीत करावा, नगर-मनमाड मार्गावरील निर्मळ पिंप्रीचा टोल नाका कायम स्वरूपी बंद करावा तसेच साई भक्तांची महामार्ग पोलिसांकडून होणारी अडवणूक थांबवावी, यासाठी शिवसेना नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली.

शिर्डीतील शिवसैनिकांनी घेतली राज्यपाल भगतसिह कोश्यारींची भेट

By

Published : Nov 18, 2019, 3:43 AM IST

अहमदनगर - राजभवन सध्या राजकीय घडामोडींचे केंद्रस्थान बनले असून शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे खाजदार सदाशिव लोखंडे आणि शिर्डीतील शिवसैनिक यांनी आज राज्यपाल भगतसिह कोश्यारी यांची भेट घेऊन शिर्डीतील विकासाचा व्यथांचा पाढा वाचला आहे.

शिर्डीतील शिवसैनिकांनी घेतली राज्यपाल भगतसिह कोश्यारींची भेट
शिर्डी विकास आराखडा स्थगीत करावा, नगर-मनमाड मार्गावरील निर्मळ पिंप्रीचा टोल नाका कायम स्वरूपी बंद करावा तसेच साई भक्तांची महामार्ग पोलिसांकडून होणारी अडवणूक थांबवावी, यासाठी शिवसेना नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यामध्ये खासदार लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे कमलाकर कोते, तालुका प्रमुख संजय शिंदे, शहर प्रमुख सचिन कोते, राहुल गोंदकर, अशोक गोंदकर अनिल पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शिर्डी विकास आराखड्याचे नुतनीकरण करतांना १९९२ च्या काही आरक्षणात किरकोळ फेरबदल करून तसेच ठेवण्यात आले आहे. मात्र, स्मशानभुमी, रिंगरोड, बगीचा, शाळा असे सार्वजनिक हिताचे आरक्षण रद्द आणि बदल करून शिर्डी नगरपंचायत आणि नगररचना विभागाने गैर कारभाराचा उच्चांक केला आहे. विकास आराखड्यात मोठे रस्ते लहान केले आणि गोरगरीबांच्या मिळकतीवरील रस्ते टाकुन त्यांना देशोधडीला लावण्यात आले रहिवाशी भागावर ग्रीन झोन टाकण्यात आला आहे.
राज्यपालांना दिलेलं निवेदन

हेही वाचा -महाशिवआघाडीबाबत अद्याप काही ठरलं नाही, १९ नोव्हेंबरनंतरच निर्णय - अजित पवार

शिर्डीकर विकासाच्या दृष्टीने हा विकास आराखडा बनवण्यात आलेला नाही, यात शिर्डीकर आणि भाविकांवर मोठा अन्याय झाला आहे. त्यामुळे विकास आराखडा रद्द करावा आणि आराखडा बनवणारया अधिकाऱ्यांची मालमत्तांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी राज्यपालांना करण्यात आली. याशिवाय नगर-मनमाड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून यामुळे अनेक लहानमोठे अपघात होवून अनेकांनी जीव गमावला आहे. याबाबत अनेक तक्रारी, आंदोलने करूनही हा रस्ता दुरूस्त झालेला नाही. यामुळे या कंपनीला मुदतवाढ न देता या मार्गावरील निर्मळ पिंप्री येथील टोल नाका कायम स्वरूपी बंद करण्याची लेखी मागणी शिष्टमंडळाने राज्यपांलाना केली आहे. गुजरात, मध्यप्रदेश आदी राज्यातील लाखो भाविक साईदर्शनाला येत असतात त्यांना महाराष्ट्राच्या हद्दीत ठिकाठिकाणी कागदपत्रे तपासणीच्या नावाखाली अडवून आर्थिक पिळवणुक केली जाते, भाविकांची ही अडवणुक त्वरीत थांबवण्याबाबतही यावेळी तक्रार करण्यात आली आहे. याशिवाय राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनाही या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.

शिर्डीतील शिवसैनिकांनी घेतली राज्यपाल भगतसिह कोश्यारींची भेट

हेही वाचा -'बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी भाजप-शिवसेनेची व्हिडिओबाजी; सेनेला शहाणपण शिकवण्याची गरज नाही'

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details