महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Suhas Kande : 'मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ...पण'; आमदार सुहास कांदेचे खळबळजनक विधान - समाधी दर्शन

एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) होवो, यासाठी साईबाबांना मी नवस केला होता. साईबाबांनी माझा नवस पूर्ण केला असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असल्याने मी नवस फेडण्यासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो. असे नांदगावचे आमदार सुहास कांदे म्हणाले.

आमदार सुहास कांदेचे खळबळजनक विधान
आमदार सुहास कांदेचे खळबळजनक विधान

By

Published : Jul 7, 2022, 9:27 AM IST

शिर्डी - बहुचर्चित शिवसेनेचे बंडखोर नांदगावचे आमदार सुहास कांदे ( Nandgaon MLA Suhas Kande ) यांनी शिर्डीत येवून सहपत्निक साईबाबांच्या समाधीचे दर्शन ( Sai Baba Samadhi Darshan ) घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कांदे म्हणाले की, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री ( CM Eknath Shinde ) होवो, यासाठी साईबाबांना मी नवस केला होता. साईबाबांनी माझा नवस पूर्ण केला असुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले असल्याने मी नवस फेडण्यासाठी सहपत्नीक साईबाबांच्या दर्शनासाठी आलो होतो.

राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यापासून मुक्त व्हावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातुन राज्याचा विकास व्हावा, असे साकडे साईबाबांना यावेळी आमदार सुहास कांदे घातले आहे. तसेच मला मंत्रीपदाची जबाबदारी देवो न देवो पण ज्यांच्यावर मी खूप प्रेम केले, त्यांना मुख्यमंत्रिपद मिळाले आहे. आता साईबाबा जी जबाबदारी देतील ती मी स्वीकारेन असेही कांदे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडी बाबत विचारले असता, त्यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत व कोणावरही आम्हा सर्व बंडखोर शिवसैनिकांचा राग, रुसवा नाही. मात्र, प्रत्येकाला आपआपल्या मतदारसंघात विकास कामे करण्याचा खरा मुद्दा होता. त्यातूनच असा हा प्रकार घडला आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदारांकडून विकासाच्या अपेक्षा आहेत, असे सांगत त्यांनी परत मातोश्रीवर जाणार का ? या प्रश्नाला उत्तर देत आमचे नेते एकनाथ शिंदे असून ते जो निर्णय घेतील, तो निर्णय आम्हाला मान्य राहील. असेही त्यांनी यावेळी सांगत आपणास मंत्रिपद व ते कोणते खाते मिळणार ? याबाबत विचारले असता त्यांनी साईबाबाच आपल्या झोळीत काय टाकील हेच योग्यवेळी पाहणे उचित ठरणार आहे, असे उत्तर देत अधिक बोलण्याचे त्यांनी यावेळी टाळले आहे.

नांदगावचे शिवसेना मात्र आता शिंदे गटात असणारे आमदार सुहास कांदे यांनी रात्री उशिरा शिर्डीत येवुन सहपत्निक साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. मात्र, त्यांच्या सुरक्षेतेसाठी मंत्र्यांसारखा मोठा बंदोबस्त पोलिसांनी सुहास कांद्यांसाठी येथे तैनात केला होता. नेमकी कोण मंत्री किंवा वरिष्ठ अधिकारी आला हे साईभक्त, ग्रामस्थांनाही प्रथम कळेनासे झाले होते.

हेही वाचा -Mumbai Heavy Rain Update : मुसळधार पावसामुळे मुंबईची दैना! रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस

ABOUT THE AUTHOR

...view details