शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरेंची बंडखोरी; अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा - sadashiv lonkhade
शिर्डीत य़ुतीचे नेते भाऊसाहेब वाकचौरेंची बंडखोरी.... अपक्ष निवडणूक लढवण्याची केली घोषणा... युतीने उमेदवारी नाकारल्याने घेतला अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय
अहमदनगर- शिर्डी लोकसभा मतदार संघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी युतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी केली आहे. ते आता अपक्ष निवडणूक लढवणार आहेत. या ठिकाणी शिवसेनेने सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. वाकचौरे हे या मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. मात्र, त्यांना उमेदवारी नाकरण्यात आल्याने त्यांनी बंडखोरीचे हत्यार उपसले आहे.
२००९ च्या निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी करत वाकचौरेंनी रामदास आठवलेंचा पराभव केला होता. मात्र, गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षातुन निवडणूक लढविल्याने वाकचौरेंचा पराभव झाला होता. शिवसेना, काँग्रेस, भाजप आणि आता अपक्ष असा वाकचौरेंचा राजकीय प्रवास राहिला आहे.
शिवसेनेने खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेसतर्फे भाऊसाहेब कांबळे हे निवडणुकीच्या मैदानात आहेत. तर प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे डॉ. अरुण साबळे यांना उमेदवारी मिळाली आहे.