महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जन आशिर्वाद यात्रा : अहमदनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी केली ज्वारी पेरणी - अहमदनगर

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे रविवारी जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी शेतात जावून ज्वारीची पेरणी केली.

जन आशिर्वाद यात्रा : अहमदनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी केली ज्वारी पेरणी

By

Published : Jul 21, 2019, 8:17 PM IST

अहमदनगर- जनतेच्या अनेक प्रश्नावर आजपर्यंत शिवसेना संघर्ष करत आली आहे. पुढेही शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही शांत बसनार नाही, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी जन आशिर्वाद यात्रेदरम्यान बोलताना केले.

जन आशिर्वाद यात्रा : अहमदनगरमध्ये आदित्य ठाकरेंनी केली ज्वारी पेरणी

जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे रविवारी जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी या ठिकाणी शेतात जावून ज्वारीची पेरणी केली.

आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेने आज अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी शिवसैनिकांना आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना आदित्य ठाकरे म्हणाले, मी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही जण आशिर्वाद यात्रा काढली नाही. तर, शेतकऱ्यांना भेटून त्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी ही यात्रा काढली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details