अहमदनगर- खासदार सुजय विखेंनी शनिवारी शेतीच्या नुकसानीची पहाणी केली. या दौऱ्यावर शिवसेनेच्या स्थानीक नेत्यांनी बहिष्कार टाकल्याचे समजते. तशी पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
खासदार विखेंचा नुकसान पाहणी दौरा, शिवसेनेचे माजी आमदार औटी अनुपस्थित - खासदार सुजय विखेंनी शनिवारी शेतीच्या नुकसानीची पहाणी केली
तीन वेळेस शिवसेनेचे आमदार असलेल्या आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या विजय औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे औटी हे विखे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे यांच्या पाहणी दौऱ्यात औटी अनुपस्थित होते.
खासदार सुजय विखेंनी शनिवारी तालूक्यातील शेतीच्या नुकसानीची पहाणी केली. शिवसेना तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी त्यांनी निरोप दिले होते. माजी आमदार विजयकुमार औटी यांनासुद्धा फोन केला होता. मात्र, ते आले नाहीत. लोकसभेला सुजय विखे यांना पारनेर तालुक्यातून मोठी आघाडी असताना तीन वेळेस शिवसेनेचे आमदार असलेल्या आणि विधानसभेचे उपाध्यक्ष असलेल्या विजय औटी यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे औटी हे विखे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे खासदार सुजय विखे यांच्या पाहणी दौऱ्यात औटी अनुपस्थित होते. यावर विखेंना विचारले असता, आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान युती धर्म पाळला आहे. तरीही कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही. मात्र, असा निकाल का लागला त्याचे आत्मचिंतन करणार असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, विखेंच्या दौऱ्यावर बहिष्कार घातल्याचे शिवसेनेचे आवाहन सोशल मिडियावर व्हायरल झाले होते. त्यावर विखे म्हणाले, मी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहीचे पत्र असते तर मान्य केले असते. जे आले नाहीत त्यांना शेतीचे पंचनामे करायचे असतील. तालुकाध्यक्ष विकास रोहकले यांनी तसे पत्र काढले असते तर ते मी मान्य केले असते. आम्ही विधानसभा प्रचारादरम्यान यूतीचा धर्म पाळला आहे. कोणाचा गैरसमज झाला तर त्याला इलाज नाही.