शिर्डी (अहमदनगर) -साईबाबांचा दर्शनासाठी भाविकांनी येत्यावेळी भारतीय पेहरावात येण्याचे साई संस्थानकडून केलेल्या आवाहनाला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असताना भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी यावर आक्षेप घेत शिर्डीत येऊन फलक काढण्याचा इशारा दिला आहे. यावर शिर्डीतील महिलाही आक्रमक झाल्या असून त्यांनी तृप्ती देसाईंना उत्तर देण्याचा चंग बांधला आहे.
शिवसेना महिला आघाडीच्या शिर्डीतील कार्यकर्त्यांनी साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले. पेहराव्याबाबत संस्थानने विनंती केलेली आहे, सक्ती केलेली नाही या मुद्द्याकडे लक्ष वेधत शिवसेना महिला आघाडीने महिलांवर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा या तृप्ती देसाई कुठे असतात, असा सवाल उपस्थित केला आहे.