अहमदनगर -राज्यातील पूरग्रस्ताना शिर्डी साईबाबा संस्थानच्या वतीने १० कोटी रुपयांची मदत करणार असल्याची घोषणा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली. राज्यातील पुरग्रस्तांना साई संस्थानने २० कोटी रुपयाची मदत करण्याची मागणी शिवसेना करत आहे. दूसरीकडे राष्ट्रवादी पक्षाचे नेते निलेश कोते यांनी ही यावेळी साई संस्थानतर्फे मोठी मदत पुरग्रस्तांना करण्याची मागणी केली आहे.
शिर्डी साई संस्थानने पूरग्रस्तांसाठी 20 कोटींची मदत करावी, शिवसेनेची मागणी - २० कोटी रूपयाची मागणी
शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात खासदार लोखंडे यांनी राज्यातील पुरग्रस्तांना साई संस्थानने 20 कोटी रुपयांची मदत करावी, अशी मागणी केली आहे.
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुंगळीकर यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात खासदार लोखंडे यांनी राज्यातील पुरग्रस्तांना साई संस्थानने 20 कोटी रुपयांची मददत करावी, अशी मागणी आहे. खासदार सदाशिव लोखंडे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आपले एक महिन्याचे वेतनही देणार असल्याच यावेळी म्हटले आहे. शिर्डी शहरातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते निलेश कोते यांनी ही यावेळी मागणी केलीय की साई संस्थाने राज्यातील पूरग्रस्तांना मोठी मदत करावी.