अहमदनगर -परभणीतीलपाथरीच्या साईबाबा जन्मस्थळ मंदिरात भव्य, अशी सर्वपक्षीय महाआरती पार पडली. यावर बोलताना शिर्डी ग्रामस्थांनी, पाथरीकरांनी आज नाही तर दररोज साईबाबांची महाआरती करावी. बाबांच्या 'सबका मालिक एक' या महामंत्राचा नियमीत जप करावा, असा सल्ला दिला आहे.
पाथरीकरांनी दररोज महाआरती करावी, शिर्डीकरांचा सल्ला हेही वाचा... पाथरीच्या साईबाबा मंदिरात सर्वपक्षीय महाआरती; साईभक्तांचा लोटला जनसागर
साईबाबांच्या नामाचा जप आज नाही ,तर दररोज करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या मनात असलेली द्वेषभावना बाबांच्या नामाचा जब केल्याने निघुन जाईल. तेव्हा सर्वांनी दररोज एकत्र येऊन साईबाबांची महाआरती करावी, असा सल्ला शिर्डी ग्रामस्थ कमलाकर कोते यांनी पाथरीकरांना दिला आहे.
हेही वाचा... 'साईबाबांनी जन्म कुठे घेतला, यापेक्षा मनुष्यजातीला कल्याणाचा मार्ग दाखवला हे महत्वाचे'