महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डी: साईदर्शनाकरता भारतीय पेहराव घालून यावा; संस्थानने लावले फलक - Sai temple Shirdi rule for devotees

काही भक्त हे तोडके कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर साई संस्थानने मंदिर परीसरात भारतीय पेहराव करत साई दर्शनासाठी यावे, असे आवाहन करणारे फलकच जागोजागी लावले आहेत.

साईमंदिराजवळ लागलेले फलक
साईमंदिराजवळ लागलेले फलक

By

Published : Nov 30, 2020, 10:02 PM IST

Updated : Nov 30, 2020, 10:33 PM IST

शिर्डी(अहमदनगर)-तिरुपती मंदिरात भाविकांना दर्शनासाठी जातांना भारतीय पेहेराव घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिर्डी साईबाबांच्या मंदिरातही भक्तांनी भारतीय पेहराव घालण्यात यावा, असे आवाहन साईबाबा संस्थानकडून करण्यात येत आहे. त्यासाठी साईमंदिर परिसरात फलक लावण्यात आले आहेत.

शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशविदेशातून मोठ्या प्रमाणात भक्त येतात. टाळेबंदीनंतर साईमंदीर खुले झाल्याने शिर्डीत मोठी गर्दी होत आहे. काही भक्त हे तोडके कपडे घालून दर्शनाला येत असल्याचे साई संस्थानच्या निदर्शनास आले आहे. त्यानंतर साई संस्थानने मंदिर परीसरात भारतीय पेहराव करत साई दर्शनासाठी यावे, असे आवाहन करणारे फलकच जागोजागी लावले आहेत. भारतीय पेहराव घालूनच दर्शन दिल जाईल अशी भक्तांन सक्ती नाही. असे असले तरी व्हीआयपी पासेस घेवून दर्शनासाठी येणाऱ्या काही भक्तांना शॉर्ट पँटवर मंदिरात सोडले जात नसल्याच समोर आले आहे.

साईदर्शनाकरता भारतीय पेहराव घालून यावा

हेही वाचा-साई प्रसादालयात १२ दिवसांत १ लाख १० हजार भक्‍तांनी घेतला प्रसाद भोजनाचा लाभ

एकतर तुम्ही फूल पँट घालून या अथवा लुंगी तरी घालुन या, असे दर्शनासाठी मुंबई येथून आलेल्या साईभक्त राहुल सचदेव यांना सांगण्यात आले आहे. त्यावर हा नियम चांगला असल्याची प्रतिक्रिया साईभक्त सचदेव यांनी दिली आहे.

हेही वाचा-शिर्डी साई संस्थानला नऊ दिवसात भाविकांनी दिली 3 कोटी 9 लाख देणगी

सध्या भारतीय पेहराव घालण्याच सक्ती साई मंदिरात सक्ती नाही. असे असले तरी त्या दृष्टीने हे उचलले पाऊलच म्हणावे लागणार आहे.

Last Updated : Nov 30, 2020, 10:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details